खूप काही

Rajesh tope : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, वाचा काय आहे नियोजन

केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये देशात सापडणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50% रुग्ण आढळून येतात. त्यामुळेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देशातील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

Rajesh tope : महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या आणि कोरोना बाधितची संख्या अधिक आहे, राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणायचे असेल, तर जलद गतीने लसीकरण करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आवश्यक तेवढ्या अधिक प्रमाणात केंद्र सरकारकडे लसींची मागणी करत आहोतस अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे. वैद्यकीय विभागाने सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे लसीकरण वेगाने झाल्यास तिसरी लाट नियंत्रणात आणू शकतो, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

28 जुलै रोजी आरोग्य मंत्रालयाकडून देशातील गेल्या 24 तासांमधील कोरोना रुग्णांच्या जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 43,654 रुग्ण आढळून आले आहेत, मंगळवारी तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदाच 30 हजारांच्या आत आलेल्या नव्या कोरोना बाधितांचे आकडा होता, परंतु 28 जुलै रोजी आकडेवारीनुसार रुग्ण संख्याही मंगळवारच्या रुग्ण संख्येपेक्षा 47 टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

देशातील 43,654 दरम्यान 24 तासांमध्ये आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे केरळमधील आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 22,129 दरम्यान रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 6,258 तर कर्नाटकात 1,501 रुग्ण आढळून आले आहेत. केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये देशात सापडणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50% रुग्ण आढळून येतात. त्यामुळेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देशातील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर भाष्य करताना महाराष्ट्रामध्ये आम्ही यासाठी तयारी करत आहोत, तसेच केंद्र सरकार आणि आयसीएमआर तज्ञांच्या सल्ल्यानेच आम्ही बालकांमधील कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष लक्ष देऊन तयारी करत आहोत, ऑक्सिजन बेड्स वैद्यकीय कर्मचारी, औषधे इत्यादींची तयारी आम्ही करून ठेवली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments