खूप काही

RAOSAHEB DANVE : कोकणवासियांचे नुकसान केंद्र सरकार भरून देणार, रावसाहेब दानवेंची माहिती

महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका कोकणवासीयांना बसला आहे.

Raosaheb Danve : महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात अतिवृष्टी झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका कोकणवासीयांना बसला आहे. चिपळूण, महाड, खेड या परिसरातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तसेच अतिवृष्टीमुळे रेल्वेसुद्धा कोलमंडली आहे, प्रवासाची आणि येण्या-जाण्याची अडचण झाली आहे, अनेकजण अनेकठिकाणी अडकून पडले आहेत.

कोकणवासीयांचे नुकसान भरून काढण्याची आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करत असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर हे पाणी कशामुळे साचलं याचं कारणही शोधणार आहोत, 160 पंप लावून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच तेथील महापालिका प्रशासनासोबत संपर्क साधून चर्चा करत आहोत, अशी माहितीही दानवे यांनी दिली आहे.

मुंबईतीलआणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आढावा मी स्वतः घेणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. या सर्व ठिकाणी मी स्वतः प्रवास करून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, बदलापूर, इगतपुरी, कसारा इथल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणात झालेल्या पूराबाबत मी स्वतः तिथे बैठक घेणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

गणेश उत्सवासाठी बसेसच्या 72 फेऱ्या कोकणवासीयांसाठी आम्ही दिल्या आहेत, एकूण वेटिंग लिस्ट जास्तीत जास्त असल्यामुळे 40 फेऱ्या वाढविण्यात आले आहेत, परंतु कोकणवासीयांची वेटिंग लिस्ट वाढली, तर अधिक ट्रेन बंदोबस्त करण्यात येईल, कोरोना काळातील प्रत्येक निर्बंधाचे पालन करून रेल्वेची सेवा केशी पुरवली जाईल, याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments