खूप काही

MUMBAI : कमला मिल आग प्रकरणातील त्या 2 अभियंत्यांचे पुन्हा निलंबन

बीएमसीच्या 2 अभियंत्यांचे दुसऱ्यांदा निलंबन करण्यात आले आहे. यापूर्वी कमला मिलला लागलेल्या आगीच्या चौकशीत दोषी आढळलेल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, मात्र

Mumbai :बीएमसीच्या 2 अभियंत्यांचे दुसऱ्यांदा निलंबन करण्यात आले आहे. यापूर्वी कमला मिलला लागलेल्या आगीच्या चौकशीत दोषी आढळलेल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, मात्र कोरोना काळात अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं होतं. अभियंता एम. जी. शेलार आणि कनिष्ठ अभियंता धर्मराज शिंदे यांचं पालिकेतून निलंबन करण्यात आलं आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत तर तिसरे उपअभियंता दिनेश महाले यांचेही निलंबन करण्याचे आदेश चहल यांनी दिले आहे.

डिसेंबर 2017 मध्ये कमला मिल परिसरात मोठी मोठी आग लागली होती, त्यात 14 जणांचा जीव गेला होता, त्यामुळे तिघांनाही निलंबित करण्यात आले होते,

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त इकबाल चहल यांनी केलेल्या चौकशी अहवालात अधिकार्‍यांकडून गंभीर दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांचे प्राण गेल्याचं म्हटलं होतं.

अधिकाऱ्याचं निलंबन म्हणजे काय?

संबंधित व्यक्तीला एखादं काम किंवा गुन्ह्यातील चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या अधिकार्याला पालिकेतील कोणतेच अधिकार मिळत नाहीत, मात्र त्या कर्मचाऱ्यांचे पगार किमान 70 टक्के आणि इतर फायदे मिळणे सुरु असते.

याआधी तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी या दोन कर्मचाऱ्यांना पालिका सेवेतून हटवण्याचे आदेश दिले होते, निष्काळजीपणामुळे आणि कर्तव्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोपात यांचे निलंबन केले होते. कमला मिल आग प्रकरणात ज्यांच्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यांना कोणत्याही किंमतीत पुन्हा सेवेत नियुक्ती केले जाऊ नये, दोघांनाही दुसऱ्यांदा निलंबन केले नाही तर त्यांना सेवेतून काढून टाकले पाहिजे, असे मत रासपचे नगरसेवक रईस शेख यांनी मांडलं होतं.

बीएमसीच्या नोंदीनुसार तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निलंबित असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments