आपलं शहर

RED ALERT : मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे या परिसरात रेड अलर्ट केला जाहीर…

RED ALERT : 3 ते 4 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे या परिसरात रेड अलर्ट जाहीर केला आहे

RED ALERT : 3 ते 4 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे या परिसरात रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

मुंबईतील बर्‍याच भागांत मागील 6 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने ट्विट केले की, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही मुसळधार पाऊस सतत पडण्याचा धोका कायम आहे.

मध्य रेल्वेने असे सांगितले की, नवी मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही काळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत होऊ शकते.

सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे अनेक मुंबईकरांचे नुकसान झाले असून अनेकांच्या घरात पाणी गेल्यामुळे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत. त्यातच वाहतूक आणि विज पुरवठा खंडित झाला असून नद्या ओसांडून वाहू लागल्या आहेत आणि जागोजागी पावसाने थैमान घातले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments