आपलं शहर

Reliance Jio : JIO बनले सर्वात पसंतीचे नेटवर्क, Voda-Idea युजर्ससाठी धोक्याची घंटा

Reliance Jio : TRAI च्या सर्वेक्षणानुसार एप्रिल महिन्यामध्ये, सब्सक्रीप्शनच्या बाबतीत रिलायन्स JIO ने खूप मोठा आकडा गाढला आहे

Reliance Jio : TRAI च्या सर्वेक्षणानुसार एप्रिल महिन्यामध्ये, सब्सक्रीप्शनच्या बाबतीत रिलायन्स JIO ने खूप मोठा आकडा गाढला आहे, त्यामुळे इतर नेटवर्क्सला ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

TRAI : एप्रिल महिन्यामध्ये 47,56,340 लाख युजर्सने आपल्यासोबत जोडल्यामुळे, सब्सक्रीप्शन चार्टमध्ये रिलायन्स जिओ टॉपमध्ये राहिले आहेत. तसेच या नव्या युजर्ससोबत जिओ सब्सक्राइबर्सची संख्या 42.76 करोड पेक्षाही अधिक झाली आहे. भारतीय दुरसंचार नियामक प्रधिकरणच्या डेटामध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

Voda-Idea च्या युजर्सची संख्या घटली

भारती एयरटेलने (Bharti Airtel) देखील एप्रिल महिन्यामध्ये 5,17,237 लाखपेक्षाही जास्त युजर्संना आपल्यासोबत जोडले आहे. ज्यामुळे त्यांच्या सब्सक्राइबर्सची संख्या 35.29 करोडपेक्षाही जास्त झाली आहे. तसेच या काळात सर्वाधिक नुकसान हे वोडाफोन-आयडियाचे (Voda-Idea) झाले आहे. कारण याच कालावधीमध्ये Voda-Idea ने आपल्या 18,10,620 लाख सब्सक्राइबर्संना गमावले आहे. ज्यामुळे त्यांच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 28.19 करोडवर आली आहे.

तिकडेच सरकारी स्वामित्व असलेल्या BSNL च्या युजर्समध्ये देखील 13,02,776 लाखांपेक्षा देखील जास्त कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण सब्सक्राइबर्सची संख्या देखील 11.72 करोडवर आली आहे.

एकूण 21.5 लाख युजर्सची संख्या वाढली :

TRAI च्या रिपोर्टनुसार मार्च 2021 च्या शेवटी वायरलेस ग्राहकांची एकूण संख्या 1,180.96 मिलियन होती. जी एप्रिल महिन्यामध्ये वाढून 1,183.11 मिलियन झाली. म्हणजेच एकूण 21,57,112 लाख नवीन युजर्सची संख्या नोंदवली गेली आहे. शहरी क्षेत्रांमध्ये वायरलेस सब्सक्रीप्शनची संख्या मार्च 2021 च्या शेवटी 64.52 करोड होती, जी एप्रिल 2021 च्या शेवटी वाढून 64.56 करोड एवढी झाली. याच काळामध्ये ग्रामीण क्षेत्रांमध्ये देखील वायरलेस सब्सक्रीप्शनची संख्या 53.57 करोडवरून वाढून 53.74 करोड झाली आहे. शहरी आणि ग्रामीण वायरलेस सब्सक्रीप्शनचा मासिक वृद्धीदर 0.06 ℅ आणि 0.32 ℅ होता. तसेच एप्रिल 2021 मध्ये बहुतांश सेवा क्षेत्रांनी आपल्या वायरलेस ग्राहकांमध्ये कमालीची वाढ नोंदवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments