खूप काही

ओबीसी आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवर निकाल, पाहा काय आहे शक्यता? Result on OBC Reservation

Result on OBC Reservation केंद्राने मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्राने दाखल केलेली फेरविचार याचिका पुन्हा फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाच्या फेरविचार याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मुद्दाकडे आहे. (Result on OBC Reservation Petition)

नेमकं प्रकरण काय?

सुप्रीम कोर्टाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाजामध्ये असतोषाचं वातावरण पसरलं आहे. महाराष्ट्रातली 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील हे ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याने विरोधी पक्षासह अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे, या सगळ्यात भर म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर त्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. (OBC Reservation in Maharashtra)

ओबीसी आरक्षणामध्ये रद्द झालेल्या सर्व जागा ओपन समाजाला गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेने घेतलेल्या या निर्णयाची फेरविचार याचिका राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचाच निकाल आज लागणार आहे, फेरविचार याचिकेवर निकाल ओबीसी समाजाच्या बाजूने येणार की? सर्वोच्च न्यायालयाकडून ही याचिका फेटाळली जाणार हे पाहाणे आता गरजेचे आहे.

स्थानिक संस्थांमध्ये ओबीसीसाठी असणाऱ्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे, त्यासाठी राज्य सरकारला एम्पिरकल डाटा (Empirical data) गोळा करण्यासाठी एक कमिशन नेमण्याचे आदेश दिले आहेत. (All reservations are over)

राज्य सरकार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा समावेश असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना कोणत्याही जागा राखीव राहणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या सुमारे 65,000 जागांवर परिणाम होणार आहे, असा दावा भुजबळ यांनी केला.

OBC Reservation : भाजपनंतर राष्ट्रवादीही मैदानात, ओबीसी आरक्षणासाठी थेट केंद्राला आव्हान

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments