आपलं शहर

Running train accident : चालत्या ट्रेन मधून उतरायला गेला आणि तोल जाऊन पडला.

Running train accident : चालत्या ट्रेन मधून उतरायला गेला आणी तोल जाऊन पडला.RPF जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव...

Running train accident : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करत होता, त्याचदरम्यान त्याचा तोल तोल गेला, ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्या मध्ये जाऊन तो फसला होता, मात्र तिथे तैनात असलेल्या एका आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला.

सेंट्रल रेल्वेच्या माहितीनुसार ही घटना मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्टेशन वरील आहे. तसेच त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती ट्रेन पूर्णपणे थांबण्याच्या आधीच ट्रेनमधून उतरत आहे. याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो ट्रेनच्या खाली पडला.

ही घटना 29 जूनची असल्याचं सांगितलं जात आहे. सेंट्रलं रेल्वेच्या म्हणण्यानुसर 29 जून रोजी तिकडे तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानाने त्या अडकलेल्या व्यक्ती ला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

चालत्या ट्रेन मधून उतरणे धोक्याचे

अशाप्रकारे चालत्या ट्रेन मधून उतरणे आपल्या जीवावर बेतू शकते. याआधी देखील अशा खूप घटना समोर आल्या आहेत, की जिथे अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे नेहमी ट्रेनने प्रवास करताना या गोष्टीची काळजी घेणे गरजेचं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments