खूप काही

SANJAY RAUT : रावतांचा राज्यसभेत बोलबाला, मोदी सरकारला धरलं धारेवर..

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र तसेच मुंबईने ज्या पद्धतीने मॉडेल वापरले, त्या त्या मॉडेलबद्दल ”सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात लावावं, तुम्ही लावाल का?

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र तसेच मुंबईने ज्या पद्धतीने मॉडेल वापरले, त्या त्या मॉडेलबद्दल ”सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात लावावं, तुम्ही लावाल का?हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की, मुंबई मॉडेलचा तुम्ही वापर करा. हा चेन्नई उच्च न्यायालयाचा आदेश आहे की मुंबई मॉडेलला तुम्ही ऑक्सिजन वितरण आणि कोविड सेंटरबाबत म्हटलं आहे, तुम्ही एकदा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश वाचा. तुम्हा काय मला सांगता महाराष्ट्र… तुम्ही एकदा येऊन पाहा महाराष्ट्राचं सरकार काय करत आहे. असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.

सगळीकडे ‘लॉकडाउन सुरू आहे, लॉकडाउन सुरूच राहील. १२५ कोटी लोकसंख्येचा देश आहे, यापैकी किती टक्के लसीकरण आपण केलेलं आहे? आपल्या देशात आतापर्यंत आपण किती लसीकरण केलेलं आहे. आजही संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा तुटवडा आहे. आज देखील लसीकरण केंद्रावर गोंधळ होत आहेत, आपण सहा कोटी लसी परदेशात पाठवल्या. आपण 9 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला. यामुळे आपली आरोग्य यंत्रणा संपूर्णरित्या अस्ताव्यस्त झाली. आता आपण तिसऱ्या लाटेबद्दल बोलत आहोत, तर तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी आपली काय तयारी आहे? आपण रुग्णालयांमध्ये किती बेड वाढवले आहेत? आपण किती डॉक्टर, नर्स तयार केले आहेत? ऑक्सिजनचे किती प्लॉन्ट उभारले आहेत, किती व्हेंटिलेटर्सची खरेदी केली आहे? रूग्णवाहिका किती आणल्या आहेत, औषधांचे काय नियोजन केले आहे? हे तुम्हाला सांगावं लागेल.” असे अनेक प्रश्न विचारून संजय राऊत यांनी सरकारला भांबावून सोडलं.

याचबरोबर ”मृतदेहांचा अपमान नाही झाला पाहिजे. ते बेकायदेशीर आहे आणि दंडनीय अपराध आहे. परंतु आपण हजारो मृतदेहांना अशाप्रकारे पुन्हा एकदा मारलं आहे, दाबलं आहे आणि अपराध केला आहे. ही कोणाची जबाबदारी आहे? मी कोणा एका व्यक्तीस किंवा सरकारला दोष देत नाही, मुद्दा यंत्रणेचा आहे आणि यंत्रणेमागे जो व्यक्ती आहे, त्यांच्या बद्दल आहे. मात्र सरकारला आमचा प्रश्न आहे की, तुम्ही संख्या का लपवत आहात? किती लोक आमच्यापासून दुरावले हे तुम्ही सांगा, खरी संख्या सांगा, जे रिपोर्ट्स आहेत, ते सरकारी संख्येपेक्षा जास्त आहे.” असं देखील संजय राऊत राज्यसभेत म्हणायला विसरले नाहीत.

“इस्त्रायल हा देश भारताचा मित्र आहे आणि माजी पंतप्रधान नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो सगळ्यात जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल झाले आहेत. पेगॅससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि ही देशाची बदनामी आहे, हे त्यांनी आम्हाला सांगू नये कारण नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागले होते. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह सर्वांचे फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत त्या वेळी म्हणाले. हा सरळ सरळ जनतेचा विश्वास घात आहे. आज आमची नावं दिसत नसली तरी ती त्यात असणार आहेत याची आम्हाल खात्री आहे. महाराष्ट्रातील अनेक नावे त्यात असण्याची शक्यता आहे” असे राऊत म्हणाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments