खूप काही

Sanjay Raut : ‘शिवसेनेत माज असायलाच हवा’, संजय राऊतांनी सांगितली शिवसेनेची व्याख्या

शिवसेनेत माज असायलाच हवा. यावेळी बोलताना 'तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही, तर तो शिवसैनिक आहे, असं म्हटलं जातं' असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut : सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता, नगरच्या येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं.

शिवसेनेत माज असायलाच हवा. यावेळी बोलताना ‘तो नारायण राणे आमका असं म्हणत नाही, तर तो शिवसैनिक आहे, असं म्हटलं जातं’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप असा वाद सतत पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना चांगलाच टोला लगावला आहे. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही.

जे लोक शिवसेना सोडून गेले, ते कुठेही गेले तरी मनाने शिवसैनिक म्हणूनच राहतात. हीच बाळासाहेबांची ताकद आहे, हीच शिवसैनिकाची ताकद आहे, संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. असं संजय राऊत यांनी म्हंटल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments