SANJAY RAUT : मराठा आरक्षणासाठी रावसाहेबांकडे शिकवणी लावू, संजय राऊतांचा टोला
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली होती. आता रावसाहेब दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Sanjay Raut : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली होती. आता रावसाहेब दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील रावसाहेब दानवे यांच्याकडे आम्ही शिकवणी लावायला तयार आहोत असा खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अनेक वेळा राजकारण चीघळताना पाहायला मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तसेच मराठा आरक्षण केंद्राचा अधिकारात येते, असा दावा देखील करण्यात आला होता, त्यामुळे सध्या भाजप आणि राज्यातील ठाकरे सरकार यांच्यातील राजकारण सध्या चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती, त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत बैठकी संदर्भात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते, त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समस्यांच्या संदर्भात मागण्यांचे निवेदन देखील दिले होते. त्यातील अनेक मागण्या या महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील होत्या, काही सामाजिक प्रश्नही होते. मराठा आणि ओबीसी आरक्षण आशा अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली होती, मेट्रो जीएसटी परतावा, पिक विमा यांचा प्रश्न, अशा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून प्रत्येक खासदाराने पाठपुरावा करवा, असा ठराव या बैठकीत ठेवण्यात आला होता. अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली होती,
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे’, आशी टीका केली होती. त्यावर राऊतांनी देखील सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे, “आम्ही त्यांची शिकवणी लावू… त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल, तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे”, असं सांगत राऊतांनी दानवेंना उत्तर दिलं आहे.