खूप काही

SENSEX RATE : डॉलरच्या तुलनेत रुपया 24 पैशांनी घसरला, पाहा आता रुपयाची किती किंमत

जगाच्या पातळीवर रुपयापेक्षा डॉलरला खूप किंमत आहे. जगामध्ये अनेक व्यवहार हे डॉलरच्या रुपात केले जातात. मात्र त्यामुळे रुपयाची किंमत दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

sensex rate : जगाच्या पातळीवर रुपयापेक्षा डॉलरला खूप किंमत आहे. जगामध्ये अनेक व्यवहार हे डॉलरच्या रुपात केले जातात. मात्र त्यामुळे रुपयाची किंमत दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

मंगळवारी, 6 जुलै रोजी डॉलरच्या तुलनेत 24 पैशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे सध्य स्थितीत डॉलरची किंमत 74.55 वर स्थिर राहिली आहे. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे आणि क्रूड तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे हा बदल जाणवून येतो.

इंटरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.28 वर सुरु झाला. ट्रेडिंग दरम्यान, 74.25 ते 74.62 च्या किंमतीतमध्ये वाढ झाल्यानंतर अखेर ती वाढ प्रतिडॉलर 74.55 वर थांबली. मागील व्यापार सत्रांच्या तुलनेत 24 पैशांची घसरण दिसून आली. सोमवारी रुपया प्रति डॉलर 74.31 वर बंद झाला होता.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक चलनात मंगळवारी सरासरी 24 पैशांची घसरण झाली आहे. ते डॉलरच्या तुलनेत 74.55 वर स्थिर राहिली आहे. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे आणि क्रूड तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे हा प्रकार दिसून आल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.18 टक्क्यांनी वाढून 92.38 वर पोहोचला आहे.

बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 18.82 अंकांनी घसरून 52,861.18 वर बंद झाला आहे. जागतिक खनीज तेलाच्या बाजारात ब्रेंट क्रूड फ्यूचर्स 0.19 टक्क्यांनी वाढून 77.31 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भांडवल बाजारामध्ये निव्वळ विक्रेते होते आणि त्यांनी सोमवारी ढोबळ आधारावर 338.43 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments