खूप काही

Sharad pawar : शरद पवारांचं ऐकतय कोण? आदित्य ठाकरे, रोहित पवारांनी हे काय केलं?

शरद पवारांच्या सल्ल्याकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे.

Sharad pawar : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भयानक अशी पूर परिस्थिती उद्भवली होती. तर आता पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून पूरग्रस्तांसाठी कोणतीही शासकीय मदत आजूनही झाली नाही. मात्र या मंत्र्यांच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं समोर आलं आहे. शिवाय मदत कार्यात अडथळा होत असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सूचनेकडे, सल्ल्याकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीज दुर्लक्ष केले असल्याची चर्चा केली जात आहे.

महविकासआघाडीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करु नका, असा सल्ला दिला होता, पण तरीसुद्धा चिपळुणात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौर केले जात आहेत. चिपळूणवासियांचे जनजीवनच उद्ध्वस्त झाले आहे, तर आता पूर ओसरल्यानंतर पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केलीआहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे दौरे झाले. गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला. यामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील दौरे केले आहेत. मात्र शरद पवारांच्या सल्ल्याकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments