Shilpa shetty : मीडिया विरोधात शिल्पा शेट्टीचा एल्गार, कोर्टात धाव
अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी माध्यमांच्या विरोधात कारवाई करत कोर्टात धाव घेतली आहे. माध्यमांनी त्यांच्याविरोधात बदनामी केल्याच्या विरोधात तक्रार दाखल

Shilpa shetty : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. तसेच राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्याची देखील झडती घेतली होती. तसेच शिल्पाची सहा तास चौकशीही केली होती. राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म्स निर्मितीशी संबंध असल्याची माहिती शिल्पाला होती का? अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात तिचाही सहभाग आहे का, याची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली.
परंतु आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी माध्यमांच्या विरोधात कारवाई करत कोर्टात धाव घेतली आहे. माध्यमांनी त्यांच्याविरोधात बदनामी केल्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या पती राज कुंद्रा या दोघांच्या विरोधात माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकाराची माहिती प्रसारित केल्याचा आरोप तिने केला आहे.
त्यामुळे आता त्या प्रसारणाच्या विरोधात शिल्पा शेट्टी माध्यमांचे विरोधात तक्रार दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच हाती लागलेल्या माहितीनुसार या माध्यमांच्या विरोधात शिल्पा शेट्टी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्या माध्यमांनी माफी मागून 25 कोटींची भरपाई द्यावी. अशीही मागणी शिल्पा शेट्टी हिने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी होणार आहे,.तसेच राज कुंद्रा आणि शिल्पा च्या बाजूने अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील त्यांचं मत व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिल्पा शेट्टीने एकूण 29 माध्यमांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.