खूप काही

STOCK MARKETS OUTLOOK : काय असेल मार्केटमधील बाजाराची गती, पाहा मार्केट एक्सपर्ट्स काय म्हणतात…

गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या खरेदीत अर्ध्या टक्क्यांनी वाढ झाली. या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स 255 अंकांनी वधारून 53,159 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी -50, 74 अंकांनी वाढून 15,294 अंकांवर पोहोचला.

stock markets outlook : गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या खरेदीत अर्ध्या टक्क्यांनी वाढ झाली. या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स 255 अंकांनी वधारून 53,159 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी -50, 74 अंकांनी वाढून 15,294 अंकांवर पोहोचला. दोन्ही क्षेत्रातील शेअर्स गुंतवणूकदारांच्या हालचालींमुळे इंट्रा डे ट्रेडमध्ये बाजाराने नवे  उंच्चांक गाठले आहेत. इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स एकावेळी 53, 266 वर पोहोचला होता, तर निफ्टीदेखील 15,952 वर पोहोचला होता. असं असलं तरी आजचा बाजार कशाप्रकारे चालणार आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत.

निफ्टी 15,915 च्या पार गेला होता, त्यामुळे आतादेखील सगळ्यांच्या नजरा यावरच टिकून राहणार आहेत. निफ्टी 16,100 पर्यंत जाऊ शकते. मार्केटमध्ये 15,700 वर सपोर्ट मिळत आहे, जर तुम्ही खरेदीदार म्हणून याकडे पाहात असाल, तर दीर्घ काळासाठी खरेदी करू शकता,  इंट्रा डे डाउन साईड खरेदी करायला काहीच हरकत नाही.

तज्ञांचे मत काय आहे?

थिंकरेडब्ल्यू सिक्युरिटीजच्या (ThincRedBlu Securities) मते, व्यापऱ्यांनी आजच्या टॉपमधून खरेदी केली पाहिजे आणि 35,700 च्या स्टॉप लॉससह 36,500 आणि 37,000 चे लक्ष्य ठेवले जाऊ शकते. हेम सिक्युरिटीचे PMS प्रमुख मोहित निगम म्हणतात की, निफ्टीला डाउनसाईडवर 15,600 चा महत्त्वपूर्ण आधार आहे. त्याचा असा विश्वास आहे की निफ्टी 16, 400 च्या पातळीवर जाऊ शकतो.

चीनकडून अपेक्षेपेक्षा चांगली बाजारपेठे

चॉईस ब्रोकिंगचे (Choice Broking) ईडी सुमित बागडिया म्हणतात की सध्या निफ्टीमध्ये 15,800 चा सपोर्ट दिसत आहे. जर ते 15,900 च्या वर टिकून असेल तर ते 16,100 -16, 200 पर्यंत येऊ शकते. दुसरीकडे, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) रिसर्च हेड विनोद नायर यांचे म्हणणे आहे की चीनकडून अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या आकडेवारीमुळे आशियाई बाजार सकारात्मक असल्याने निफ्टीची पातळी वाढू शकते. फेडरल रिझर्व्हच्या निवेदनांमुळे जागतिक बाजारपेठेलाही वेग आला आहे. याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला नक्कीच मिळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments