खूप काही

Sukanya Samriddhi Yojana :250 रुपयांची करा इन्व्हेस्ट, मुलींचे भवितव्य करा सेफ

सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी ही एक सरकारी योजना आहे.

Sukanya Samriddhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही योजना पालक आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणासाठी, लग्नासाठी व इतर खर्चांसाठी भांडवल तयार करू शकतील, यासाठी आहे.( SSY is one of the most popular small saving schemes for the girl child.)

सरकारने चालू केलेल्या सुकन्या योजनेमध्ये मोठ्या संख्येने लोक आपले पैसे गुंतवत आहेत. या सुकन्या समृद्धी योजनेत किमान 250 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकतात. लोकांना एक वर्ष गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक केलेली ही रक्कम मुलीच्या मॅच्युरिटीनंतर दिली जाते. हे खाते मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत किंवा तिचे वय 18 वर्षानंतर लग्न होईपर्यंत चालवले जाते.(sukany samriddhi yojana investrs 250 make girls future safe)

योजनेचा फायदा

दररोज 100 रुपये वाचवून तुम्ही 15 लाख रुपये कमवू शकता. जर दर महिना तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षभरात 36 हजार रुपये जमा राहतील. एक वर्ष जमा केल्यानंतर एकूण रक्कम 77 63 रुपये होईल. त्यावर 7.6 टक्के व्याज मिळते. मुलीला एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर रक्कम 15,27, 637 रुपये मिळते.

सुकन्या समृद्धी योजना वरील व्याजदर वार्षिक 7.6 टक्के झाले आहे . (एप्रिल जून) मध्ये 2021 या योजनेचे व्याज दर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्के करण्यात आला होते. परंतु सरकारने 24 तासाच्या आत जुने व्याजदर लागू केले आहे. सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी ही एक सरकारी योजना आहे.

समृद्धी योजना खाते कोण उघडू शकेल.?

>भारतातील कोणताही नागरिक आपल्या मुलींसाठी हे खाते उघडू शकतो.

>योजनांतर्गत जेव्हा मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तेव्हाच खाते उघडता येते.

>अठरा वर्षानंतर मुलगी स्वतःचे खाते चालवू शकते.

>या योजनेअंतर्गत 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते.

>योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते.

>एका मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येते.

>सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे कोणत्या ही बँकेत किंवा टपाल कार्यालयातून उघडता येते.

>या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रथम बँकमध्ये आपले खाते आयपीपीबी खात्यात पैसे जोडावे लागते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments