खूप काही

SANJAY RAUT : संजय राऊतांचा पेगाससवरून हल्लाबोल, भाजपला दुसरं काय काम?

राजकारण म्हणजे काय नवीन गोष्ट नाही. राजकारण करणाऱ्याला स्वतः कोण आहे, हे सुद्धा समजत नाही, नक्की या देशात स्वतंत्र आहे का, कोणाचाही फोन कोणीही चोरून ऐकतोय नक्की काय सुरू आहे.

Sanjay Raut : राजकारण म्हणजे काय नवीन गोष्ट नाही. राजकारण करणाऱ्याला स्वतः कोण आहे, हे सुद्धा समजत नाही, नक्की या देशात स्वतंत्र आहे का, कोणाचाही फोन कोणीही चोरून ऐकतोय नक्की काय सुरू आहे. मात्र पेगासीस सॉफ्टवेअर वापरून जासूसी करणं ही सोपी गोष्ट नाहीये, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

याचे कारण पुढे आले पाहिजे, यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागेल. पेगासीस सॉफ्टवेअर साठी नक्कीच कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असेल, नक्की पैसे कुठून आले याची माहिती आणि याचा तपास झालाच पाहिजे. 350 कोटींच्या वर कोणीतरी पेगासीसला दिले आहेत. असा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

या सर्व गोष्टींमागे काहीतरी कारण असेल, हे सर्व पैसे कोणाच्या खात्यातून गेले, त्यामागचे सूत्र कोण आहेत, विरोधकांवर पाळत का ठेवली जाते आणि एवढेच असेल तर भाजपला दुसरे काम तरी काय? त्यांना विरोधकांवर टीका करण्याशिवाय दुसरे काम नाही आणि राज्याच्या विकासासाठी सरकार कुठेही कमी पडले नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

पूर्ण राज्यात गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी प्रमाणे पाऊस होत आहे, अनेक ठिकाणी राज्यात मोठ्या घटना घडत आहेत, राज्यातील जनतेला पुराचा सामना करावा लागतोय, या सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री मंत्रालयात होते आणि या सर्व घटनांवर निरीक्षण कक्षात बसून लक्ष देत होते, महाराष्ट्रातील या संकटाचे मुख्यमंत्र्यांना प्रचंड दुःख आहे, त्याबद्दल केंद्राकडे देखील त्यांनी मदतीची मागणी केली आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments