फेमस

Tata Motors : टाटाची सर्वात फेमस ‘ती’ कार होणार दुसऱ्या देशांमध्ये लाँच

Tata Motors : या कारने टाटाच्या सेल्सला टॉपवर नेऊन ठेवले आहे.

Tata Motors : टाटा नेक्सॉन ईवी (Tata Nexon EV) या कारला भारतामध्ये खूप जास्त पसंती मिळत आहे. या कारने टाटाच्या सेल्सला टॉपवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे कंपनी हळूहळू या कारला आजूबाजूच्या देशांमध्ये देखील लाँच करण्याच्या विचारात आहे.

टाटा मोटर्सने Nexon EV ला काल (28 जुलैरोजी) नेपाळमध्ये NPR 35.99 लाखांच्या Base Price वर लाँच केले आहे. नेपाळमध्ये Tata Nexon EV तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल, ज्याच्यामध्ये XM, XZ+ आणि XZ+ Lux ट्रीम्स यांचा सामवेश आहे. तसेच टाटाने नेपाळमध्ये Nexon च्या बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी किंवा 1,60,000 किमी ठेवली आहे.
इलेक्ट्रिक कारवरसुद्धा 3 वर्ष किंवा 1,25,000 किमीची वॉरंटी दिली आहे. टाटा सिपरडी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सोबत भागीदारी करून, नेपाळमध्ये Nexon EV ची विक्री करेल. टाटाने आधीच ग्राहकांसाठी 25,000 वर रिफंडेबलवर बुकिंग सुरु केली आहे.

हुंडई कोना एसयूवी आणि महिंद्रा E20 यांच्या शिवाय नेक्सॉन ईवी ही शेजारील देशांत निर्यात केली जाणारी भारताची इलेक्ट्रिक कार बनली आहे. टाटा मोटर्समध्ये पीवीआईबीचे प्रमुख मयंक बाल्दी यांनी असे म्हटले आहे की, “आम्ही नेपाळमध्ये आमची इलेक्ट्रिक एसयूवी – नेक्सॉन ईवीच्या लाँचची घोषणा करत आहोत. कारमध्ये खूपच आकर्षक असे डिझाईन, सुरक्षा, फिचर्स आहेत. त्यामुळे ती ग्राहकांच्या पसंतीची आहे.

या कारमध्ये Fully Dedicated चार्जिंग नेटवर्क आहे, जो नेक्सॉनच्या ग्राहकांना एक वेगळीच इकोसिस्टिम देतो.” टाटा मोटर्स ईवीच्या सुरुवातिमध्येच,संपूर्ण देशात अत्याधुनिक डीसी चार्जर सोबतच चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर आणि होम चार्जिंग सोलुशन्स सोबतच नेपाळमध्ये ईवी इंफ्रास्ट्रक्चर स्थापित करायला देखील मदत करेल. नेक्सॉन भारतामधील सगळ्यात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे. भारतामध्ये टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच नेक्सॉन ईवीचा डार्क वेरिएंट लाँच केला आहे, ज्याला नेक्सॉन डार्क असे नाव आहे आणि त्याची किंमत 10.40 लाख रुपये एवढी आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments