आपलं शहर

Floods in Kolhapur कोल्हापुरातल्या पुराचा मुंबईवर परिणाम, काटकसर करण्याची गरज

गेल्या काही दिवसांपासून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे,

Floods in Kolhapur : गेल्या काही दिवसांपासून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम थेट मुंबईच्या जनजिवनावर होण्याची शक्यता आहे. जर कोल्हापूर परिसरातील पूर सदृष्य परिस्थिती निवळली नाही, तर हा परिणाम अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (The impact of the floods in Kolhapur on Mumbai, the need for austerity)

कोल्हापुरात आलेल्या महापुराचा दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, गोकुळ दुध संघाने शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी दुध संकलन बंद केले आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण इथे आलेल्या भयावह पुरामुळे दूध संकलनासह वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मुंबईतील अनेक दूध विक्रेत्यांकडे एका दिवसाचा दुध साठा शिल्लक आहे, मात्र पूर परिस्थिती स्थिर राहिल्यास दुधाची टंचाई वाढण्याची श्क्यता वर्तवली जात आहे. मुंबईत येणारा मोठ्या प्रमाणातील भाजीपालाही पश्चिम महाराष्ट्रातून येत असतो, त्यामुळे महापुराचा फटका या क्षेत्रालाही बसला आहे. पूर परिस्थिती काय असल्यास दुधासह भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम झालेला दिसून येईल.

मुंबईमध्ये गुजरात, सांगली, सातारा, मराठवाडा आणि कोल्हापुरातून दुध येत असतं. या सगळ्यांमध्ये कोल्हापूरच्या गोकूळ दुधाला खूप मोठी मागणी मुंबईमध्ये आहे, मात्र या सगळ्यात महापुरामुळे सगळी वाहतूक ठप्प झाली आहे, परिणामी या सर्वाचा दुधाच्या संकलनावर परिणाम झाला आहे.

हेही वाचाच…

HEAVY RAIN : पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत, नद्यांना महापूर…

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प….

Mumbai updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प; रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप

 

Ratnagiri-Chiplun Update : कोकणात भारतीय नौदलाचे जवान तैनात, असं असेल रेस्क्यू ऑपरेशन

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments