खूप काही

Udhav thackeray : विम्याची रक्कम नुकसानग्रस्तांना कधीपर्यंत मिळणार, मुख्यमंत्र्यांचा सितारमन यांना सवाल

विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Udhav thackeray : राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी पुरामुळे ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले,त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे लवकरात लवकर ग्राह्य धरावेत असेही निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज (29 जुलै) पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री आमदार भास्कर जाधव मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी वरिष्ठ मंत्री अधिकाऱ्यांसह 11 विमा कंपन्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांनी विमा तातडीने द्यावे.त्याचे निकाली काढावेत पुराच्या पाण्याने उद्योग व्यवसाय आणि विमाधारक नागरिकांची कागदपत्रे वाहून गेली आहेत त्यामुळे या गोष्टीसाठी त्यांच्याकडे आग्रह धरू नये त्यांच्या दाव्याची खातरजमा करून लवकरात लवकर रक्कम पूर्णत्वाने द्यावी अशी मागणी देखील अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे अशी मागणी.

केरळ काश्मीर मधील पुराच्या वेळी विमा कंपन्यांना आदेश दिले होते. त्याची आठवण करून देत महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी विमा कंपन्यांना तसेच आदेश देण्याची विनंती मुख्यमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. लोक विमा कंपन्यांकडून भीमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत आपण आज काही विमा कंपन्यांना तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली असून या बैठकीत विमा कंपन्यांनी पंचनामाच्या आधारे एकूण विमानाच्या 50 टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे.

मात्र त्यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांनीच्या  मुख्यालयात आणि योग्य निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्‍यक आहे. केरळ आणि कश्मीरमधील मोठ्या पुराच्यावेळी सरकारने विमा कंपन्यांना आदेश दिले होते,तसे मुख्यमंत्री यांनी पत्रात म्हटले आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कम हे कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी. असेही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सर्व पूरग्रस्त भागांमध्ये महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक दुकाने वाहने आणि घरे यांचे नुकसान झाल्याने लोक विमा कंपन्यांकडून वीमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments