खूप काही

Udhav thackeray : महाराष्ट्र अनलॉकच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री घेणार आज महत्त्वपूर्ण निर्णय…

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी आज (29 गुरुवार) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य विभाग, आरोग्य अधिकारी, टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत.

Udhav thackeray : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली होती.राज्यात हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत होते, त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली मात्र जूनच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झालेला पाहून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती.

राज्यातील दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले असून पुढील काही दिवसात काही जिल्ह्यांमध्ये आणखी काही प्रमाणत अनलॉक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी आज (29 गुरुवार) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य विभाग, आरोग्य अधिकारी, टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत.

या बैठकीमध्ये राज्यात किती जिल्हे कितपत अनलॉक करता येईल गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते मंडळी तसेच अनेक पक्षांकडून मुख्यमंत्र्यांना लोकल संदर्भात पत्र पाठवली जात होती, कोरोनाच्या दोन्ही डोस पूर्ण असलेल्या लोकांना मुंबई लोकल ची परवानगी देण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे गेल्या काही दिवसांपासून केली जात होती म्हणून या सर्व संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

आता पर्यंत महाराष्ट्रामध्ये  62.8 लाखांच्या दरम्यान रुग्णसंख्या झाली, त्यापैकी 60.6 लाख लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.तर 1.32 एक लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला.

 

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments