फेमस

Uddhav Thackeray : तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं

विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला.

Uddhav Thackeray  : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली.

आज मुंबई आणि पुणे परिसरात अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरीदेखील उद्धव ठाकरे परिवारासह पंढरपुरात रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray)  स्वतः गाडी चालवत पंढरपूरकडे रवाना झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला.

यंदा आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दाम्पत्याने महापूजा केली.

आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे”, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments