आपलं शहर

Vaccination off : लसीकरण बंद; मुंबई, ठाणे, कल्याणसह या ठिकाणी लसींचा तुटवडा…

लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईत अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर येत असते. आजही तसाच काहीसा प्रकार घडला आहे.

Vaccination off : लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईत अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर येत असते. आजही तसाच काहीसा प्रकार घडला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार या भागांमध्ये पालिकेच्या केंद्रांमधील लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. अशामुळे लस घेण्यासाठी प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत. (Vaccination off; Vaccine shortage in Mumbai, Thane, Kalyan and other places)

काहीदा मुंबईत वाढलेल्या पावसामुळे लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत, तर काहीदा लस संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर येत आहे. लसीकरण केंद्र बंद असण्याची जुलै महिन्यातील ही तिसरी वेळ आहे.

वसई विरार महापालिका हद्दीतदेखील सारखीच परिस्थिती असणार आहे. दिवसभरासाठी पालिकेची संपूर्ण लसीकरण केंद्रे बंद असणार आहेत. आतापर्यंत 2 लाख 95 हजार 992 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती वसई-विरार पालिकेकडून देण्यात आली आहे. यातील 2 लाख 25 हजार 811 जणांनी पहिला तर फक्त 65 हजार 181 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे, मात्र इतर जणांचे दुसरे डोस आणि अनेक जणांचे पहिले डोस बाकी असल्याने अनेकजण लसीच्या प्रतिक्षेत आहेत.


कल्याण डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण करण्यात येणारी तब्बल 25 लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत, पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर वारंवार लसींचा तुठवडा जाणवत असल्याने अनेकजण खाजगी रुग्णालयांमध्ये लसींची रक्कम देऊन लसीकरण करून घेत आहेत, आतापर्यंत कल्याण पालिकेकडून 3 लाख 73 हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

२० जुलै रोजीच्या 24 तासात एकूण 351 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पालिकेसाठी समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. तर 525 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील 7 लाख 07 हजार 050 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 97 % असणार आहे. सध्या मुंबईत 6161 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments