खूप काही

Varsha gaikwad : महापुरामुळे शाळांचे 28,20,76000 रुपयांचे नुकसान, विभागाचा मोठा निर्णय

शाळांचे नुकसान भरून काढण्यासाठी अंदाजे 28 कोटी 20 लाख 76 हजार रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Varsha gaikwad : महाराष्ट्रातील गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागला. राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसला आहे. शेतीसोबतच, अन्नधान्य तसेच आर्थिक गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक पाहणीतून जिल्ह्यातील एकूण 456 शाळांचे देखील अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. अनेक शाळांच्या वर्गखोल्यांचे तसेच संरक्षण भिंतींचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचं अढळून आले आहे. काही शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके पुराच्या पाण्यातून वाहून गेली असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ, गगनबावडा या दोन्ही तालुक्यामधील शाळांच्या पोषण आहाराचे प्राप्त झालेले तांदूळ आणि इतर धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या या पूर परिस्थितीचा सामना शालेय शिक्षण विभागाला देखील करावा लागत आहे, सर्व शाळांचे नुकसान भरून काढण्यासाठी अंदाजे 28 कोटी 20 लाख 76 हजार रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

पुरामध्ये नुकसान झालेल्या सर्व शाळांच्या माहिती ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी घेतली. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या शाळा जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानच संबंधी माहिती देखील दिली. तसेच शाळांचे दुरूस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी शिक्षण विभागाला दिले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments