खूप काही

Vijay Wadettiwar : पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर, राज्य सरकारची मोठी घोषणा

सरकारकडून पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाण्याची घोषणा करण्यात आली.

Vijay Wadettiwar : गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोकणातसह पश्चिम महाराष्ट्रतल्या काही भागात भयानक अशी पूर परिस्थिती उद्भवली होती. परंतु आता पुराचं पाणी भरण्यास सुरुवात झाली.पण अनेकांचे संसार, अनेकांची घरे, अनेकांचे उद्योग यांचे  महापुरामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काल (28जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना राज्याकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अशी माहिती मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

त्याच बरोबर ज्यांची घरे या महापुरामध्ये पूर्णपणे जमीनदोस्त झाली असतील ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिली जाणार आहे. ही माहिती देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सरकारकडून पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाण्याची घोषणा करण्यात आली.ज्या नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना सरकारकडून 10 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका हा अन्नधान्यावर झाला आहे.तर सरकार कडून अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे, सरकारकडून ही पहिली आर्थिक मदत लवकरात लवकर केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही महत्त्वाची घोषणा केली.

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments