VINAYAK RAUT : PM CARE फंडाचा भ्रष्टाचार सगळ्यांच्या समोर मांडू, विनायक राऊत भडकले
संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Vinayak raut : संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. कोरोनाच्या चर्चेला पंतप्रधानांनी सभागृहला उत्तर द्यावे ही अपेक्षा शिवसेनेची आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची JPC चौकशीची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे करणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
आज सायंकाळी पंतप्रधान कोरोनाबाबत सर्व पक्षांना प्रेझेंटेंशन करणार आहेत, मात्र कोरोनाबाबत सभागृहात विस्तृत चर्चा व्हायला हवी, त्यापूर्वी पंतप्रधान विस्तृत प्रेझेन्टेशन करत असतील तर त्याला शिवसेना उपस्थित राहील, तिथे आम्ही दाखवून देऊ की कोरोना उपाययोजनांनमध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे. PM केअर फंडाचा किती करोडो रुपयांचा दुरुपयोग केला जात आहे, ते दाखवून देऊ. या गोष्टी आम्हाला पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत,अंसही मत विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे.
नवनियुक्त नागरी उडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची मी काल भेट घेतली. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. विमानतळ विमान उड्डाणाला सज्ज झाले आहे. DGCA रिपोर्टची वाट पाहत आहोत. हा परवाना मिळवण्यासाठी 28 जून ला IRB ने अर्ज केला आहे. कोरोना मुळे DGCA टीम तिथे जाऊ शकली नाही. पण ती लवकरात लवकर जावी आणि लवकर परवाना मिळावा अशी आमची मागणी आहे. मंत्र्यांनी मला 8 ते 10 दिवसांत रिझल्ट देतो, असा शब्द मला दिला आहे. 8 – 10 टीम सिधुदुर्गात गेली आणि जर तत्काळ परवाना मिळाला, तर गणेश चतुर्थीपूर्वी विमान उडायला काही हरकत नाही, असं देखील त्यांनी सांगीतले. DGCA ने ज्या सूचना केल्या होत्या त्यांची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.