आपलं शहर

Weather Update :मिठी नदीला पूर, 1200 जणांचे स्थलांतर, 4 वाजता हायटाईड, वाचा अजून update

Weather Update:मुंबईमध्ये (16 जुलै रोजी) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

Weather Update:मुंबईमध्ये (16 जुलै रोजी) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी 9 वाजता मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारी म्हणून 1200 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सोबतच येत्या काही तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यात अंधेरी, चेंबूर, कुर्ला आणि सायन या भागातही पावसाचा जोर कायम आहे. काही भागात पाणी भरल्यानंतर तलावासारखी परिस्थिती दिसून येत आहे. चुनाभट्टी रेल्वे रुळालाही पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पहाटे गांधी मार्केट भागातील मुसळधार पावसात रस्ते पाण्याखाली गेलेले दिसले, यामुळे दुचाकीस्वारांसह पायी प्रवास करणाऱ्यांवरही अस्मानी संकट आल्याचे दिसत आहे.

प्रादेशिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या 24 तासांत शहराच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरीसह मुंबईमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments