आपलं शहर

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार, विक्रोळीला नेमकं काय झालं

शनिवारी मध्यरात्री पासूनच मुंबई शहर-उपनगरात पावसाचा कहर सुरु आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

शनिवारी मध्यरात्री पासूनच मुंबई शहर-उपनगरात पावसाचा कहर सुरु आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये एक दुमजली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली.

यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अजूनही मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. विक्रोळी पश्चिम भागात देखील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली.

शनिवारी मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण जखमी झाले आहेत. आणखी सात ते आठजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य अजुन देखील बचावकार्य सुरु आहे.

पाहा व्हिडीओ

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments