Vivo : आता बाजरात येणार VIVO चा लॅपटॉप, लवकरच होणार भारतामध्ये लाँच
Vivo : स्मार्टफोन्सनंतर VIVO कंपनी आता लॅपटॉप सेगमेंटमध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहे.

Vivo : स्मार्टफोन्सनंतर VIVO कंपनी आता लॅपटॉप सेगमेंटमध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, VIVO कंपनी लवकरच भारतीय बाजारामध्ये आपला लॅपटॉप लाँच करून, Realme आणि Xiamoi सारख्या ब्रॅण्ड्सना टक्कर देणार आहे. लॅपटॉप लाँच करण्याची तारीख अजून जरी कंपनीने सांगितली नसली तरी भारतीय बाजारात लवकरच लॅपटॉप येईल, अशी आशा वर्तवली जात आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार लॅपटॉप मधील काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच लॅपटॉप सोबतच वीवो आता स्मार्ट वॉच देखील बनवण्याच्या तयारीत आहे असे दिसून येत आहे.
91 मोबाईलच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये माहिती दिली गेली आहे की, VIVO ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार त्यांनी युजर्सना प्रश्न उपस्थित केले की, त्यांना कोणत्या टाईपचा प्राईस ब्रँड, डिस्प्ले साईज आणि प्रोसेसर पाहिजे. तसेच या लॅपटॉप मध्ये 11th जनरेशन इंटेल कोर आई 3 किंवा आई 5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सध्या लॅपटॉपच्या लाँचिंग आणि किंमती विषयी अजून माहिती समोर आली नाही.
[Exclusive] Vivo laptops with 11th Gen Intel processors in the works, survey suggests https://t.co/5121PPKOM0
— 91mobiles (@91mobiles) August 9, 2021
तसेच टिपस्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार VIVO ने स्मार्ट वॉचला विचारात घेऊन देखील एक सर्वे केला आहे. त्यामुळे लवकरच बाजारामध्ये VIVO चे स्मार्ट वॉच येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी VIVO वॉच सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच होऊ शकतो अशी आशा आहे.