blog

ban vs aus t20 : ऑस्ट्रेलिया 62 धावांवर ऑल आऊट, हा खेळाडू ठरला गेम चेंजर

ban vs aus t20 : ऑस्ट्रेलिया संघाला बांग्लादेश विरुद्ध मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यामध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे.

ban vs aus t20 : ऑस्ट्रेलिया संघाला बांग्लादेश विरुद्ध मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यामध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. 123 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ निव्वळ 62 धावांवर ऑल आऊट झाला.

मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये, बांग्लादेशच्या संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा 4-1 असा एकतर्फी पराभव केला आहे. तसेच ही मालिका जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

T20 च्या या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा हा आज पर्यंतचा सगळ्यात कमी स्कोअर आहे. हे असे पहिल्यांदाच घडले आहे जेव्हा, ऑस्ट्रेलियाचा संघ बांग्लादेशविरुद्ध T20 मालिका हरला आहे. जरी या ऑस्ट्रेलियन संघामध्ये डेव्हिड वॉर्नर (David warner), स्टीव्ह स्मिथ (Steve smith), मार्नस लाबुशने, (Marnus labushnge), ग्लेन मॅक्सवेल (Glenn maxwell), मिचेल स्टार्क (Mitchel starc) अशा मोठ्या खेळाडूंचा सामावेश जरी नसला तरी ही ऑस्ट्रेलिया संघासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

या संपूर्ण मालिकेमध्ये बांग्लादेशच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. तसेच बांग्लादेश संघाचा वरिष्ठ आणि प्रमुख खेळाडू ‘शाकीब अल हसन’ याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. तसेच या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाला आता सगळीकडून टिकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्यांची खिल्ली उडवत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments