खूप काही

Bombay Stock Exchange : गोपाला पॉलिप्लास्टचा शेअर्स धमाका, भर लॉकडाऊनमध्ये मोठा नफा

शेअर्सच्या तुलनेत स्मॉलकॅप शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा मिळवून दिला आहे.

Bombay Stock Exchange :कोरोनामुळे अनेकांसमोर रोजागाराचे प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमवाल्या आहेत. दुसरीकडे उद्योगपती आणि व्यावसायिकांचे तर कबरंड मोडले आहे. परंतु शेअर बाजारा हा एकच मार्ग घर बसल्या पैसे कमवू देत होता, त्यात देखील मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचं दिसून आले आहे. पण अशा परिस्थितीत ही दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या तुलनेत स्मॉलकॅप शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा मिळवून दिला आहे.

गोपाला पॉलिप्लास्टच्या शेअरने फक्त वर्षभरात गुंतवणूकदारांना 2 हजार 300 पट नफा मिळवून दिला आहे, तर या तुलनेत सेन्सेक्स फक्त 44.68 टक्के इतकाच राहिला. या वर्षाच्या सुरुवातीपासून गोपाल पॉलिप्लास्टचे शेअरमध्ये 1688 टकक्यांनी वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकादारांनी या शेअरमध्ये वर्षभराआधी 10 हजारांची गुंतवणूक केली, त्यांना आता थेट 2 लाख 30 हजारांचा फायदा झाला आहे.

जून महिन्याच्या शेवटी प्रमोटरांची भागीदारीही या फर्ममध्ये एकूण 93.83 इतकी होती. तर पब्लिक शेअर होलडर्सची भाग हे 7.17 टक्के इतके होते. या कंपनीत बँक ऑफ बडोदा ( bank of Bank ) सर्वात मोठी भागेदारी होती. बीओबीचे भागभांडवल हे 5 टक्के किंवा 5 लाख 12 हजार शेअर्ससह सर्वाधिक होतं. 1, 38, 833 शेअर्स असलेले केवळ 3 हजार 682 इतके भागेदार होते, ज्यांच्याकडे 2 लाख रुपयांची वैयक्तिक बचत होती. जून तिमाहीच्या शेवटी 3 विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांकडे 23 हजार 369 शेअर्स होते.

बीएसईवर आज स्टॉकमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 52 व्या आठवड्यात बीएसईचे दर हे 118.25 रुपये इतके झाले आहे. मागील 5 दिवसांमध्ये शेअर्समध्ये 27.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर स्टॉकमध्ये 5 टक्क्यांनी अपर सर्किट झाला आहे.

गोपाला पॉलीप्लास्टचं शेअर 5, 20, 50, 100, आणि 200 दिवसांच्या मूविंग एव्हरेजपेक्षा अधिक आहे. कंपनीचा आर्थिक फायदा झाला आहे. मार्च महिन्याच्या तिमाहीत 491.32 टक्क्यांच्या वाढीसह कंपनीने 17 कोटी 14 लाखांचा निव्वळ नफा मिळवला. हाच नफा मागील वर्षी यावेळेस 4 कोटी 38 लाख रुपये इतका झाला होता.

तिमाहीच्या आधारवर नेट प्रॉफीटमध्ये 65.33 वरुन 49.44 इतका तोटा झाला आहे.वार्षिक आधारावर मार्च 2021 या आर्थिक वर्षात नेट प्रॉफीटमध्ये 407 टक्क्यांनी वाढ होऊन 63.62 कोटी रुपये इतके झालं आहे. तर मार्च 2020 या वित्तीय वर्षात 20 कोटी 70 लाखांच आर्थिक नुकसान झालं होतं.

गोपाला पॉलीप्लास्टने (gopala popliplastine)  भारतात वोवन लेबल आणि पीपी वोवन बॅगची निर्मिती करते. वोवन बोरोचा वापर हा सिमेंट, उर्वरक, चिनी, रसायन आणि अन्नपदार्थांसारख्या उद्योगात पॅकेजिंगसाठी केला जातो.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments