नॅशनल

Taliban Cabinet : अमेरिकेत 6 वर्षे कैदी, आता अफगणिस्तानातील संरक्षण मंत्री; पाहा कसं असेल मंत्रिमंडळ

तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. नव्या सरकारमधील मंत्र्यांची नावंदेखील जाहीर केली आहेत.

Taliban Cabinet : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी आक्रमण केल्यानंतर नवं सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान्यांनी पुढाकार घेतला आहे, तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. नव्या सरकारमधील मंत्र्यांची नावंदेखील जाहीर केली आहेत. अफगानिस्तानातील अल जजीरा चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने जगातील सर्वात खतरनाक जेलमधील कैद्याला थेट संरक्षण मंत्रिपद दिल्याची चर्चा आज जगभरात सुरु आहे. मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर या कैद्याचं नाव जगात चर्चेचा विषय ठरला आहे. (6 years prisoner in US, now Minister of Defense in Afghanistan; See what the cabinet will look like)

मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर हा अमेरिकेतील तुरुंगात 6 वर्षे कैदी होता. तो तालिबान्यांमधील अनुभवी कमांडर असल्याचंही म्हटलं जात आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा खास असल्याचंही काही वृत्तसंस्थानी दिली आहे. 2001 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर अमेरिकन सैन्याने त्याला पकडलं होतं. 2007 पर्यंत ग्वांटानामो बे इथल्या तुरुंगात कैदी म्हणून त्याला ठेवण्यात आलं होतं. मात्र अमेरिकेने त्याला अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात दिलं होतं.

लादेनच्या गँगमधील मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर याला जगातील अत्यंत धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक माणले जाते, त्याच्या नावावर अनेक मोठे गुन्हे दाखल असल्याचीही चर्चा आहे.

तालिबानी मंत्रिमंडळाची इतकी चर्चा का?

तालिबानने अफगाणिस्तानात मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यापासून जगाचं लक्ष याकडे वेधलं आहे. एका आतंकवादी संघटनेकडे संपूर्ण देश गेल्यानंतर त्या देशाशी संबंधीत असलेल्या इतर देशांवरही याचा न कळत परिणाम होऊ शकतो, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानचा प्रमुख कोण आणि त्याच्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाची वर्णी लागणार, याचीच चर्चा सध्या जगात सुरु आहे. देशाचा कारभार चालावा यासाठी तालिबानी संघटनाच आपल्या हातात सत्ता घेणार आहे, यामध्ये हाजी मोहम्मद इदरीसकडे ‘द अफगाणिस्तान केंद्रीय बँकेचा’ (DBA) कार्यकारी प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.

तालिबानच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, काबूलचा गव्हर्नर, काबूलचा महापौर आणि गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख अशी पदे असणार आहेत. तालिबानचं सरकार कसं असेल, याची माहिती देणाऱ्या तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदकडे माहिती आणि संस्कृती मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments