आपलं शहर

Scholarship Examination : शिक्षण विभागाची पूर्वसूचना न देताच, आठवी व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द….

काेविड प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द केल्याचे बुधवारी उशीरा जाहीर केले.शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता. बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित

Scholarship Examination :शिक्षण विभागाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.8 वी) परीक्षा गुरुवारी (12ऑगस्ट) घेण्याचे ठरविले हाेते. पण काेविड प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द केल्याचे बुधवारी उशीरा जाहीर केले.शिष्यवृत्ती परीक्षा हाेणार की नाही याबाबत बुधवारी दिवसभर संभ्रम सुरु हाेता.( 8th and 5th Scholarship Examination canceled without any prior notice from the Education Department)

बुधवारी दुपारी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घाईत नियाेजित तारखेला खाजगी अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व मंडळाच्या शाळांमध्ये नियाेजित तारखेला परीक्षा घेतली जाणार असल्याचे पत्र काढण्यात आले. परंतू रात्री उशीरापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पालक व शिक्षकांमध्ये गाेंधळ सुरु हाेता. यात शिक्षक परिषद संघटनेने बुधवारी दिवसभर परीक्षा रद्द करण्याबाबत मुंबई उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला. ज्यामुळे अखेर रात्री उशीरा परीक्षा रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने घोषत केले.

शिष्यवृत्ती परीक्षा ऐच्छिक असते. ही मागील वर्षीची परीक्षा आहे. त्यानुसार आता ही परीक्षा देणारे विद्यार्थी पुढील इयत्तेत गेले आहेत. तरीही या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. शाळांनीही नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावरही या परीक्षेच्या अतिरिक्त ऑनलाइन तासिका घेतल्या. विद्यार्थी आणि पालकांची तयारी संपुर्ण झालेली असताना परीक्षा रद्द का केली असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द करायची होती तर आदल्या दिवशीपर्यंत त्याबाबत निर्णय का घेण्यात आला नाही, असे. अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा सुरुवातीला 8 मे रोजी घेण्यात येणार होते. तसे नियोजन करण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आली आहे. अखेर 12 ऑगस्ट रोजी घेण्याचे परीक्षा परिषदेने निश्चित केले. मात्र, मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात गुरुवारी परीक्षा घेऊ नयेत, असे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिले. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी परीक्षा परिषदेकडे करण्यात आली.

मुंबई मनपा आयुक्तांनी महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरक्षा व आरोग्याच्या कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामध्ये इतर शाळांच्या विद्यार्थ्यांबाबत विचार केला नव्हता. शिक्षक परिषदेने याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला होता.बुधवारी सकाळपासून शिक्षक परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. सर्वच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार व्हावा. याबाबत मागणी केली होती. याला यश आले आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या दोन्ही पर्यायांचा विचार केला नाही. त्यामुळे मुंबईत महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये गुरुवारी होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यामुळे महापालिका आणि खासगी शाळांमधील जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांची तयारी करूनही त्यांना परीक्षा देता येणार नाही.

हे ही वाचा :

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments