खूप काही

Aditya thackeray : आदित्य ठाकरे करणार पालिका निवडणुकीत नेतृत्व, कशी असेल रणनीती

मुंबई महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपवून लढविण्यात येतील,

Aditya thackeray : मुंबई महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपवून लढविण्यात येतील, असे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. याचा अर्थ मुंबई महापालिकेची तिकिटे जास्तीत जास्त आदित्य ठाकरे यांच्या मर्जीने वाटपाचे हे धोरण आहे. उद्धव ठाकरे यांनी 1997 च्या निवडणुकीत शिवसेनेची व्यूहरचना करताना 45 विद्यमान नगरसेवकांची तिकिटे कापली होती. तसा प्रयोग आदित्य ठाकरे करतील काय किंवा आदित्य ठाकरे यांना तेवढे स्वातंत्र्य की जे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते ते उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांना देतील काय?, या सवालाचे उत्तर अद्याप शिवसेनेतून कोणी दिलेले नाही.

1997 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष संघटनेत लक्ष घालून महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप केले होते. त्या निवडणुकीत चेहरा अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचा होता. परंतु सगळी शिवसेनेची व्यूहरचना उद्धव ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय प्रयोगाला त्यावेळी चांगले यश मिळाले होते. आता हाच प्रयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या  जबाबदारी देण्याचा  प्रयत्न करत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1997 मध्ये केलेला प्रयोग 2022 मध्ये करण्याचा मनसुबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आखत असल्याचे दिसून येत आहे.अर्थात याचा निकाल अर्थात याचा निकाल “1997” प्रमाणेच लागेल याची काही खात्री देता येत नाही. काय होता 1997 चा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रयोग.?? कशासाठी केला होता त्यांनी तो प्रयोग.?? तो प्रयोग होता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आपला वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा.

तरीही आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व शिवसेनेत बळकट करण्यासाठी या निवडणुकीचा वापर करून घेण्याचा इरादा उद्धव ठाकरे पक्का करत आहेत. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची तिसरी पिढी मुंबईत शिवसेनेचे आघाडीवर राहून नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी ठाकरे घराण्यातील दुसरे युवा नेतृत्व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत आहेत. एका अर्थाने दोन ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीची ही समोरासमोर उभे

ठाकून लढाई होण्याची शक्यता आहे.

उध्दव ठाकरे यांना त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि विद्यमान शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली होती. तर आदित्य ठाकरे यांच्या सोबतीला पक्षाचे सचिव व त्यांचे सहाय्यक सुरज चव्हाण आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आहेत. त्यामुळे या दोघांसह आदित्य ठाकरे यांनी आतापासून मुंबई पिंजून काढण्यास सुरुवात केली असून, वरळीसह मुंबईतील महापालिकेच्यावतीने तसेच पक्षाच्यावतीने रावबल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांना ते आवर्जुन हजेरी लावत आहेत. तसेच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निर्देश देत मुंबईतील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य ठाकरेंच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यावरही आयुक्तांनी अधिक भर दिला असून, त्यासाठी ते संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करायला भागही पाडत आहेत.

आदित्य ठाकरे येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. 2017 ची सार्वत्रिक निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा शिवसेनेचा विचार होता. परंतु भाजपशी फारकत घेतल्याने तसेच राजकारणातील कमी अनुभव लक्षात घेता शिवसेनेने तेव्हा एक पाऊल मागे घेतले. परंतु आता आदित्य ठाकरे यांनी मुंबईवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून, उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून त्यांचे नेतृत्व पक्षाला दिले जाणार आहे. त्यामुळे पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात येणार आहे.

तर मोठी जबाबदारी मोठी असणार आहे कारण एका बाजूला आदित्य ठाकरे हे राज्याचे मंत्री असले तरी ते मुंबईतच कायम असल्याने, त्यांनी आपले मनसुबेही जाहीर केले आहेत. त्यामुळे आता बाबांप्रमाणेच आदित्य ठाकरे मुंबईत नगरसेवकांचा आकडा 110 हून अधिक निवडून आणत आपले पक्षातील नेतृत्व सिध्द करतात का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. जर 2022 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठे यश मिळवल्यास लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाणार असून, पक्षाचे एक नेतृत्व राज्याला दिले जाणार आहे. पक्षाचे नेता ते राजकीय नेता अशी त्यांची वेगळी ओळख यामधून निर्माण केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

 

 

हे ही वाचा : 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments