आपलं शहर

Air india : राज्य सरकारकडून एअर इंडियाची मदत खरेदी करण्याबाबत चर्चा

नरीमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा चर्चा केली आहे.

Air india :  नरीमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा चर्चा केली आहे. या संबंधी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी एअर इंडियाचे सीएमडी राजीव बन्सल यांच्यासोबत बैठक देखिल घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने या इमारतीसाठी 1400 कोटींची ऑफर दिली असल्याचं सांगण्यात येतआहे, तर एअर इंडियाने 20 हजार कोटींची मागणी सरकार कडे केल्याचे समजते.कारण एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या मंत्रालयाच्या इमारतीजवळ आहे. त्यामुळे जर ही इमारत राज्य सरकारच्या ताब्यात आली तर मंत्रालयावरील बराचसा ताण कमी होऊ शकतो.

ज्या जागेवर एअर इंडियाची इमारत आहे ती जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे.एअर इंडियाला खर्चाच्या रुपात राज्य सरकारला 400 कोटी अदा करायचे आहेत. त्यामुळे या सौद्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च होतील, असे बोलले जात आहे. राज्य सरकारने एअर इंडियाच्या इमारतीच्या वॅल्यूएशनसाठी एक कॉपी प्रदान करण्याची मागणी एअर इंडियाकडे केली आहे.

सातत्याने एअर इंडिया तोट्यात असून 2018 मध्ये जमिन आणि बिल्डिंग लीज राईट्सची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी भाजप सरकारच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले होते. राज्य सरकारने 23 मजली इमारतीसाठी 1
1 हजार 400 कोटींची बोली लावली होती.

सरकारची याेजना मंत्रालयातील काही प्रमुख विभागांना एअर इंडियाच्या इमारतीत शिफ्ट करण्याची आहे. दरम्यान, 1993 मध्ये एअर इंडियाच्या इमारतीत स्फोट झाला होता. त्यामुळे ही इमारत भक्कम असेल की नाही, यावरही प्रश्न उपस्थित होत आहे. या इमारतीसाठी दोन हजार कोटी खर्च करणे योग्य ठरेल, असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments