खूप काही

Ajit pawar : 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न कायम,कोशीयारी यांची न्यायालयाला टाळाटाळ…

विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आढेवेढे सुरूच आहेत.

Ajit pawar : विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आढेवेढे सुरूच आहेत. न्यायालयाने समजावल्यानंतरी राज्यपाल निर्णय घेत नसल्याने काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच याची आठवण करून दिली. विधान परिषदेवरील आमदारांच्या निवडीवर लवकर निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली असता राज्यपालांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत ‘सरकार आग्रही नाही तर तुम्ही का आग्रह धरता,’ असा अजब सवाल करीत वेळ मारून नेली. The issue of appointment of 12 MLAs remains, Koshiyari avoids court …

राज्य सरकारने 12 आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशीची यादी दिल्यानंतरही राज्यपाल कोश्यारी यांची महिनोन्महिने टाळाटाळच सुरू आहे.गेल्या काही महिन्यांपासून राज्यात एकीकडे करोनाचं संकट घोंघावत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात शिवसेना विरुद्ध भाजपा हा वाद देखील सातत्याने घोंघावताना दिसून आला आहे. सत्तेत आल्यापासून शिवसेनेचे विरोधी पक्षात असलेल्या भाजपासोबत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत आहेत.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं देखील सूचक टिप्पणी केली आहे. “राज्यपाल हे न्यायालयाला बांधील नाहीत, परंतु घटनात्मक जबाबदाऱ्यांचे पालन करणे त्यांचे कर्तव्य आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपाल मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर विनाविलंब योग्य तो निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आणि विश्वाास आहे.

मंत्रिमंडळाने 12सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवून आठ महिन्यांचा काळ उलटला आहे. हा कालावधी पुरेशा कालावधीपेक्षा अधिक आहे. मात्र शिफारस करण्यात आलेल्या सदस्यांची माहिती घेण्यासाठी आणि निष्कर्षाप्रती येण्यासाठी त्यांनी हा वेळ घेतला असावा, असे न्यायालयाला वाटते”, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची अपेक्षाच न्यायालयानं व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments