राजकारण
Amit thackeray : मनसेची नवी सुरुवात? अमित ठाकरेंचा मास्टर प्लॅन काय?
राज यांनी अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी दिल्यास ते आदित्य यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं दिसून येत.

Amit thackeray : अमित ठाकरेंचं आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल?सध्या पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी 2012 मध्ये राजकारणात प्रवेश केला. ‘उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या’, असं भावुक आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली होती.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आदित्य यांनी युवासेनेची जबाबदारी स्वीकारली. विद्यापीठातील निवडणुका, विद्यार्थ्यांचे प्रश्न याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष घातलं. आता राज यांनी अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी दिल्यास ते आदित्य यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं दिसून येत.
पुढील माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा !
हे ही वाचा :