BJP : महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी रणनीती

BJP : मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने मिशन मुंबईची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मागील निवडणुकीत भाजपचे तब्बल 82 जागा जिंकल्या होत्या. पण, आगामी निवडणुकीत ज्या नगरसेवकांची कामगिरी उत्तम त्यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे. मागील पाच वर्षातील नगरसेवकांची कामगिरी कशी आहे, याचा आढावा घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात कोणत्या नगरसेवक आणि नगरसेविकेनं काय काम केला, याचा सर्व्हे भाजपने केला आहे.BJP’s new strategy on the backdrop of municipal elections
या सर्व्हेमध्ये अनेक भाजप नगरसेवकांची कामगिरी ही निराशजनक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांचा पत्ता कट करण्याची भाजपने तयारी केली आहे. पाच वर्षांतील कामगिरीच्या बळावरच विद्यमान नगरसेवकांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाणार आहे. अशी माहिती समोर आले आहे की, जवळपास 40 टक्के विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही.
तर दुसरीकडे, काँग्रेसने सुद्धा नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेऊन नगरसेवकांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपने जरी विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली तरी त्यांना काहीही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष चरणजीत सिंह साप्रा यांनी दिली.
नारायण राणे यांना मंत्रिपद देऊन मुंबई जन आशीर्वाद यात्रा काढून भाजपने रणशिंग फुंकले आहे. पण, दुसरीकडे, मुंबई महापालिकेतील 40 टक्के नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवण्याच्या भाजप तयारीत आहे. या नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
हे ही वाचा :