BMC News : पालिका कंत्राटदाराच्या संरक्षणासाठी महापालिका करणार कोरोना संरक्षण वस्तूचा पुरवठा
कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत.

BMC News :16 ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची (no oxygen available )कमतरता चिंतेचा विषय आहे.मुंबईत अद्यापही कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तिसरी लाट येण्याची भिती कायम आहे.
त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच रुग्णालये,जंबो कोविड सेंटरमधील डॉक्टर, आरोग्य सेवक यांच्या सुरक्षिततेसाठी N95 मास्क व 3- प्लाय मास्कसह पीपीई किट्स यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका कंत्राटदारांना तब्बल 9 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.(corona kit)
पालिका रुग्णालये, (Mahanagar Palika)जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक हे 24 तास कार्यरत असतात.मात्र त्यांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना N – 95 मास्क व 3 प्लाय मास्कसह पीपीई किट्स यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने टेंडर मागवले होते.
त्यानुसार 16 कंत्राटदारांनी या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र त्यापैकी 10 कंत्राटदार हे अप्रतिसादात्मक ठरले. तर उर्वरित 6 पैकी लघुत्तम दर असलेले 3 कंत्राटदार यांचे दर प्रतिसादात्मक ठरले. त्यामुळे या 3 कंत्राटदारांना मास्कसह पीपीई किट्सचा पुरवठा करण्याचे 8 कोटी 70 लाख रुपयांचे कंत्राटकाम देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, मे.एटलास मल्टी ट्रेड लि. 170,रुपये प्रति नग दराने 1 कोटी 90 लाख रुपयांचे 70 हजार नग (70%), मे. सिम्फनी मल्टीट्रेड लि. कडून 170 रुपये प्रति नग दराने 25 लाख 50 लाख रुपयांचे 15 हजार नग (15%), मे. टोयो फॅशन्स लि. कडून 170रुपये प्रति नग दराने 25 लाख 50 हजार रुपयांचे 15 हजार नग (15%) याप्रमाणे 1 कोटी 70 लाख रुपयांचे 3 प्लाय मास्कसह 1 लाख पीपीई किट्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
यामध्ये, मे. एटलास मल्टी ट्रेड लि. 175 रुपये प्रति नग दराने 4.90 कोटी रुपयांचे 2 लाख 80 हजार नग (70%), मे. सिम्फनी मल्टीट्रेड लि. कडून 165 रुपये प्रति नग दराने 1कोटी 5 लाख रुपयांचे 60 हजार नग (15%), मे. टोयो फॅशन्स लि. कडून 175 रुपये प्रति नग दराने 60 हजार नग (15%) याप्रमाणे तब्बल 7 कोटी रुपयांच्या N95मास्कसह 4 लाख पीपीई किट्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.