खूप काही

BMC News : पालिकेचा निवडणुका जवळ, भाजपची धावपळ सुरु, अनेक प्रश्नांची सरबत्ती

पालिकेचा निवडणूक विभागही विचारात पडले आहे.

BMC News : फेब्रुवारी ( February) महिन्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत सुधारणा होणार आहे. मात्र,द्या्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा्ा  महानगरपालिकेला अद्याप कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेचा निवडणूक विभागही विचारात पडले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूका ( BMC election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत सुधारणा करायची आहे.बदललेल्या भौगोलिक परीस्थीती नुसार मतदार संख्येनुसार ही सुधारणा करण्यात येणार आहे. काही महिन्यांपुर्वी राज्य निवडणूक आयोगाची आणि पालिका निवडणूक विभाग बैठकही झाली आहे.मात्र,त्यानंतर निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सुचना आलेल्या नाहीत अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

सपालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रभागांच्या फेररचनेमुळे राजकीय वादही निर्माण झाले आहेत.2021 ची जनगणना अजून झालेली नाही , त्यामुळे निवडणूकीचा मोठा प्रश्न . भाजपने उपस्थीत केला आहे.(BJP )

मुंबईत( Mumbai )  साधारण 96 लाखाच्या आसपास मतदार असून आतापर्यंत यासाठी आठ हजार मतदार बुथ तयार केले आहेत.मात्र,कोव्हिडचा पार्श्‍वभुमीवर मतदान ( votes) बुथची संख्या वाढविण्याची गरज लक्षात घेऊन ही संख्या 11 हजार पर्यंत जाणार आहे.प्रत्येक बुथवर हजार ते दिडहजार मतदारांची नावे आहेत.कोविडमुळे ही संख्या 800 पर्यंत कमी करण्यात येईल.असे पालिकेचे अतिरीक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.निवडणूकीच्या तयारीबाबत वेळोवेळी विभागा सोबत बैठक घेऊन चर्चा केल्याच सांगितले जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments