BMC Updated : BMCची WHO सोबत नवी आरोग्य मोहीम, बीपी व शुगर असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा…
मुंबईत असे बरेच लोक आहेत, ज्यांना माहित नाही, की त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब समस्या आहे

BMC Updated :कोरोनाबरोबरच मुंबईकर रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह यासारख्या जीवनशैलीच्या आजारांशीही लढा देत आहेत.अनियमित आणि अस्वास्थ्य आहार, गतिहीन जीवनशैलीमुळे हजारो मुंबईकर उपरोक्त आजाराने ग्रस्त आहेत. मुंबईत असे बरेच लोक आहेत, ज्यांना माहित नाही, की त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब समस्या आहे. जेव्हा त्यांच्यासोबत एखादा मोठा अपघात किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असते, तेव्हा कळते की ते त्या आजाराने ग्रस्त आहेत.अशा परिस्थितीत बीएमसीने मधुमेह आणि रक्तदाब सारख्या असंसर्गजन्य रोगांनी ग्रस्त लोकांसाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
जागतिक आरोग्य संघटना या मोहिमेत BMCला मदत करत आहे. BMCघरोघरी जाऊन प्रौढांची निवड करून, त्यांच्या जीवनशैलीची माहिती घेण्यात येईल, नंतर त्यांचे आरोग्य तपासले जाईल. या सर्वेक्षणावरून, किती लोक या आजाराने ग्रस्त आहेत याची BMC ला कल्पना येईल.बीएमसीच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्ष शाह यांनी सांगितले की मधुमेह ,रक्तदाब सारख्या असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त लोकांची नोंद बीएमसीच्या क्लिनिक रुग्णालयात दिली जाते, परंतु खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची यात नोंद नाही. म्हणून मुंबईत असे किती लोक आहेत जे या आजाराने ग्रस्त आहेत, हे शोधण्याचा निर्णय BMCने घेतला आहे. सर्वेक्षणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे.
प्रथम प्रश्न, नंतर चौकशी कोणत्याही व्यक्तीची चाचणीसाठी निवड केली जाईल, त्यांच्या मंजुरीनंतर, त्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी, लागतील जसे की त्याचे काम, जेवणाची वेळ, ते आहारात काय खातात, त्यांना किंवा त्यांच्या घरात कोणालाही कोणताही आजार किंवा आरोग्यासंबंधी समस्या आहेत का ? असे अनेक प्रश्न. विचारल्यानंतर, मधुमेह आणि इतर चाचण्यांसाठी रक्त घेतले जाईल,रक्तदाब तपासण्यासाठी युरिन घेतले जाईल जेणेकरून मीठाचे प्रमाण कळू शकेल.
मुंबईत एकूण 238 जनगणना ब्लॉक आहेत. प्रत्येक ब्लॉकमधून 25 घरांची निवड केली जाईल. घरांची निवड केल्यानंतर प्रत्येक घरातून 18 वर्षांवरील एक व्यक्ती निवडली जाईल आणि त्याचे रक्त आणि युरिनचे नमुने घेतले जातील. यासह, व्यक्तीचा रक्तदाब देखील तपासला जाईल.कधीकधी हे आजार झाल्याचे लोकांना उशिरा समजतो, जेव्हा तो समजतो तेव्हा हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मुंबईकरांनी वर्षातून दोनदा त्यांचे रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी केली पाहिजे. यासह, सामान्य कर्करोगाची तपासणी देखील आवश्यक आहे.