फेमस

Bollywood actors :आलिया आणि रणवीर कपूरच्या लग्नाचा बार उडणार, अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत

Bollywood actors : सध्या चर्चेत असणारी बॉलिवू़डमधील जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट(ranbir kapoor and alia bhatt) . अनेक महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंग आणि लग्नाबद्दल अनेक अफवा सोशल मीडिावर पसरत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट कर आहेत. एखाद्या कार्यक्रमात, लग्न समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये देखील दोघे नेहमीच एकत्र दिसतात. रणबीर आणि आलियाने अजूनही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही.

पण आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या दोघांच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.अभिनेत्री लारा दत्ताचा ( Lara datt)  ‘बेल बॉटम’  bell bottom हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा ट्रेलरला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. लारा ही चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लाराने राणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘मला विश्वास आहे की रणबीर आणि आलिया या वर्षी लग्न करणार आहेत.’ पुढे लारा म्हणाली, ‘मी ‘जुन्या पिढीतील’ आहेत, त्यामुळे आजच्या काळात कोणत्या जोड्या एकमेकांना डेट करत आहेत, हे मला माहित नाही. मात्र, मी काही जोडप्यांबद्दल बोलू शकते.

काही दिवसांपासून रणबीर कपूरने देखील एका मुलाखतीत सांगितले की ‘जर कोरोना लॉकडाऊन नसता तर आतापर्यंत आमचे लग्न झाले असते’, असे म्हटले होते.

;

पण कोरोना व्हायरसमुळे या दोघांच्या लग्नाचा प्लान पुढे ढकलण्यात आला परंतु लवकरच ही रिअल लाइफ जोडी ब्रम्हास्र ( bramhas )या सिनेमात मोठ्या पडद्यावर पहिल्याांदच एकत्र झळकणार आहे. हे दोघं अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments