फेमस

Bollywood actors : यंदा इंडियन फिल्म फेस्टिवलचे मानकरी कोण ठरले पहा

मिर्झापूर 2' ही सीरिज सर्वोत्कृष्ट सीरिज ठरली आहे.

Bollywood actors :राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते पंकज त्रिपाठी यांना वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार ‘शट अप सोना’ने पटकावला असून लुडो, मिर्झापूर 2 आणि मिमी या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी त्यांना गौरविण्यात आले.

मिर्झापूर 2’ ही सीरिज सर्वोत्कृष्ट सीरिज ठरली आहे. या फिल्म फेस्टिव्हल मध्ये शुक्रवारी विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ‘सोरारई पोटरु’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून याच चित्रपटासाठी सूर्या शिवाकुमार सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे, तर लुडो’साठी अनुराग बसू सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत.तसेच शेरनी’ या सीरिज मध्ये दमदार अभिनयासाठी विद्या बालन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

आयएफएफएम (IFFM)अर्थात ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ नुकतंच पार पडल्याचे पाहायला मिळाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महोत्सवाचे व्हर्च्युअली आयोजन करण्यात आले होते.त्या फेस्टिव्हल मध्ये ‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजचा जलवा पाहायला मिळाला.’द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयी आणि समांथा अक्कीनेनी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments