फेमस

Bollywood actors: 55 वर्षातही तरुण अभिनेता करतोय नवीन विक्रम

मिलिंद त्याचे काही मजेदार व्हिडिओ देखील नेहमीच शेअर करत असतो

  1. Bollywood actors : अभिनेता, मॉडल मिलिंद सोमण आपलं एक्टिव्ह लाईफ आणि फिटनेस यामुळे खूप चर्चेत असतो चाहत्यांना हेल्थ टिप्सही देत असतो. यासोबतच मिलिंद त्याचे काही मजेदार व्हिडिओ देखील नेहमीच शेअर करत असतो . वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद आपल्या तब्येतीची पूर्ण काळजी घेताना दिसतो. मिलिंदचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यापासून त्यानं रोज धावाण्यास सुरूवात केली. दिवसभरात जवळपास 5 ते 6 किलोमीटर रोज धावण्या रियाज तो करतो. (Milind Soman)

दररोज व्यायाम करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणारा मिलिंद आता एक नवा विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे 450 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करण्याचा विडा उचलला असून त्याच्या या प्रवासाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी त्यांनी प्रारंभ झाला आहे. (15 August )

;

मिलिंद सोमणच्या या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. मिलिंदने त्याच्या सहकाऱ्यांसोबत या प्रवासाला दादर येथून (start Dadar to Gujarat)  सुरुवात झाली. त्याच्या या निश्चयाचे मिलिंदचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी मिलिंद आपले प्रेरणास्थान असल्याच्या कमेन्ट केल्या आहेत. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक मिनिटांत 40 पुशअप्स मारुन दाखवले. पुशअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे.

यापूर्वी मिलिंद पुशअप्स चॅलेंजमुळे चर्चेत होता. मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.वर्क आऊटसोबत मिलिंद अनेक मजेशीर व्हिडओ शेअर करताना दिसत असतो. अलिकडेच त्याने मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसून गार पाण्याने आंघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर सेलिब्रिटी (Ankita konwar) नसली तरी आपली एक्टिव्ह लाईफस्टाईल आणि फिटनेसमुळे प्रचंड चर्चेत असते.मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात खूप अंतर असल्याने या दोघांचे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. या दोघांनाही फिटनेसची आवड असल्याने अनेकदा वर्कआऊट करतानाचा एकत्र फोटो शेअर करत असतात.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments