फेमस

Bollywood actress : अभिनेत्री राणी मुखर्जीचे नवीन अपार्टमेंट; आता जॉकी श्रॉफ झाले शेजारी

येथे एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे

Bollywood actress  : हिचकी’  ( hichhki ) या नावाजलेल्या चित्रपटातील बॉलीवुड अभिनेत्री राणी मुखर्जीने  ( Rani Mukerji)अलीकडेच मुंबईतील खार येथे एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे.

राणीने या वर्षी ही प्रॉपर्टी ( new apartment) खरेदी केली आहे. राणी मुखर्जीचं हे नवीन अपार्टमेंट 3545 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. या व्यतिरिक्त, या अपार्टमेंटमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

खरेदी केलेल्या या 4 BHK अपार्टमेंडमुळे राणी मुखर्जी अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिकेटर हार्दिक आणि कुणाल पंड्या यांची शेजारी झाली आहे. ( Jockey short , Hardik pandya )

राणी मुखर्जीच्या या अपार्टमेंटची किंमत 7.12 कोटी इतकी आहे.

राणीच्या या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे. तर आउटडोअर फिटनेस सेंटर ,क्रीडाप्रेमींसाठी रॉक क्लाइंबिंगचीही व्यवस्था असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतील खार ( Mumbai khar ) परिसरातील या राणीच्या अपार्टमेंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथून समुद्राचं दर्शन होतं.

आपण राणीच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो तर राणीच्या अगामी चित्रपटाचं नाव ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ असं आहे.या चित्रपटाचे निर्मितीकरण निखिल आडवाणी आणि झी स्टुडिओ करत आहेत.

राणी मुखर्जी हिचा’ हिचकी ‘या चित्रपटाने जगभरात 250 कोटींहून अधिकची कमाई केली आणि अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये महत्त्वाचे पुरस्कारही पटकावले आहेत .

यापूर्वी राणी मुखर्जी 2019 मध्ये ‘मर्दानी 2’ ( mardani 2 चित्रपटात दिसली होती. मर्दानी 2 ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि चित्रपटातील राणीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्याचवेळी, राणीचा आणखी एक चित्रपट ‘बंटी और बबली 2’ सुद्धा रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. राणीसोबत सैफ अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments