फेमस

Bollywood news : अभिनेता अनुपम श्याम यांच्यावर काळाचा आघात

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार अनुपम श्याम यांचे निधन झाले. त्यांचे वय 63 वर्षांचे होते. लाइफ लाइन इस्पितळात 9 आगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Anupam Shyam : छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार अनुपम श्याम यांचे निधन झाले. त्यांचे वय 63 वर्षांचे होते. लाइफ लाइन इस्पितळात 9 आगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होत असल्याने. उपचारांसाठी त्यांनाआयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. .

यावर्षी ‘मन की आवाज प्रतिज्ञी’ मालिकेचा दुसरा सीझन सुरू झाला, तेव्हा अनुपम यांनी पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सुरुवात केली. शूट संपल्यानंतर ते आठवड्यातून तीनदा डायलिसिससाठी जायचे.

तब्येत ठीक नसतानाही त्यांनी सज्जन सिंहची भूमिका साकारण्यामागचे कारण अनुपम यांनी एका मुलाखतीत ते म्हणाले की, प्रेक्षकांना माझे पात्र खूप आवडतं आणि चाहत्यांचे त्यांना मन दुखवायचे नव्हतं म्हणून अनुपम यांनी ही भूमिका स्वीकारली होती. ते म्हणाले होते की, ‘मृत्युशी युद्ध सुरू होतं. तिथे जिंकून आलो.

दरम्यान, अनुपम श्याम उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील होते. त्यांनी ‘दस्तक’, ‘दिल से’, ‘लगान’, ‘गोलमाल’ आणि ‘मुन्ना मायकल’ सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम देखील केले . याशिवाय त्यांनी ‘रिश्ते’, ‘डोली अरमानों की’, ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘हम ने ली शपथ’ सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments