फेमस

Bollywood News : 2 चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित ;कोण मारणार बाजी

चित्रपटांचे प्रदर्शन गेल्या काही महिन्यांपासून रखडले

Bollywood News : प्रशासनानं कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच दुसरीकडे निर्मात्यांनी देखील या संधीचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील ( Bollywood & Hollywood) अनेक चित्रपट एकामागे एक प्रदर्शनाच्या रांगेत आहेत.

कोरोनाचा प्रहर थोडा कमी झालेला दिसत आहे. या पार्श्वभुमीवर मनोरंजन (entertainment) क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. त्यामुळे कित्येक निर्मात्यांनी आपले चित्रपट प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आणि अंमलातही आणले .

बॉलीवूडचा ‘बेल बॉटम’ खिलाडी अक्षय कुमार  (akshay kumar) आणि हॉलीवूडमधील फास्ट अँड फ्युरियस (fast and furious 9) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. आता निर्मात्यांना मोठी चिंता आहे की, बॉक्स ऑफिसवर नक्की कोण बाजी मारणार?

सलमान खानचा( Salman khan ) बिग बजेट राधे द मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याला थोड्याफार प्रमाणात यश मिळाले होते ..

‘ फास्ट अँड फ्युरियसच्या ट्रेलरला चाहत्यांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या यापूर्वीच्या आठही भागांना जगभरातून कमालीचा प्रतिसाद मिळाला आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही या सीरिजचे कोट्यवधी चाहते आहेत.’फास्ट अँड फ्युरियसचा ‘ प्रेक्षकवर्गही वेगळा आहे. त्यामुळे एकाअर्थी त्याची आणि बेल बॉटमची बॉक्स ऑफिसच्या तराजुत तुलना करणं चूकीचं आहे .बेल बॉटममध्ये अक्षय एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचेही दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात अक्षयचा लक्ष्मी (laxmi)  नावाचा चित्रपट आला होता. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला साफ नाकारले.

आगामी काळात त्याच्या दोन वर्षांपासून अक्षय कुमारच्या रख़डलेल्या सुर्यवंशी (suryavashi)  चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments