फेमस

Bollywood News : बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री लवकरच नवीन चेहरा दिसणार

प्रत्येकजण आपल्या कलागुणांनी चाहत्यांची मने जिंकत असतात.

Bollywood News : बॉलिवूड हे सर्वांसाठीच एक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी सर्वच सेलिब्रिटीज तारेवरची कसरत करताना दिसतात. प्रत्येकजण आपल्या कलागुणांनी चाहत्यांची मने जिंकत असतात. सोशल मीडियावर त्यांचे बरेच फॅनफॉलॉअसर (FAN follower )प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न हे सेलिब्रिटी कीड प्रयत्न करत असतात.बॉलिवूडमधे अनेक कलाकारांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल आहे. तर काहींनी आपली ओळख वेगळ्या क्षेत्रात निर्माण केलेली आहे. सेलिब्रिटींमध्ये आलिया भट्ट,जान्हवी कपूर,सारा आली खान, टायगर श्रॉफनंतर आहेतच आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणखी एका स्टारकिड्सची लवकरच भर पडताना दिसणार आहे.( Aliya Bhatt, tiger shorif,sara Ali Khan)

प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी ( ahan Shetty)  आता बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री करण्यासाठी सज्ज झालेला आहे. ‘तड़प’ ( tdap )हा चित्रपट मिलन लूथरिया यांनी दिग्दर्शित केला असून अहान शेट्टी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपले पदार्पण करणार आहे. चित्रपटात अहान, सोबत तारा सुतारिया, देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर या जोडीचे फोटो वायरल होताना दिसत आहेत. ‘तडप’ सिनेमाच्या प्रदर्शन 3 डिसेंबर रोजी सिनेमा चित्रपटगृहांतील रुपेरी पद्यावर सर्व चित्रपटप्रेमींच्या मनोरंजनासाठी दाखवण्यात येणार आहे.

अहान शेट्टी, तारा सुतारिया, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महात्त्वांच्या भूमिकांमधून रुपेरी पडद्यांवर झळकताना दिसणार आहेत. तड़प’ सिनेमातील अहान आणि ताराच्या फर्स्ट लूकने ( tara sutariya) प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. ‘तडप’ हा चित्रपट साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टूडियो यांच्याद्वारे निर्माण केलेला आहे. लवकरच एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.

बॉलिवूड स्टार ताराने तडप मुव्हीच्या पोस्टरवर कॅप्शन दिले की (यह प्यार की तड़प, अब अंजाम तक ले जाएगी).तारा सुतारियाने दोन वर्षांपूर्वी ‘शोबिज’ या ( shobuj)  चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते.ताराने अनेक सिनेमात आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर चाहत्यांच्या मनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. अहानने पोस्टर डेब्यू करत, मिलन लुथरियाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर आता प्रदर्शित होणाऱ्या अहान आणि ताराची फ्रेश जोडी चाहत्यांना कीतपत पसंत पडेल हे लवकरच स्पष्ट होईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments