फेमस

Bollywood news : ‘भूज प्राईम, ऑफ इंडिया’ झाले रिलीजच्या आधीच लिक… काय आहे प्रकरण घ्या समजून

निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

Bollywood news  :कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शिकरण लांबणीवर गेले आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

कोरोना काळातील निर्बंधांमुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. आता सर्व चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (hotstar) ऑनलाईन प्रदर्शित केले जात आहेत. तर यात देखील दिग्दर्शकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. आधीच अनेक संकटे पार करत ‘द प्राईम व ऑफ इंडिया’ संपूर्ण केला आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्यावर्षीपासून यांचे प्रदर्शन थांबवले होते.

येथे होणार होते रिलीज :

Bollywoodlife.com च्या बातमीनुसार, चित्रपटाचा प्रीमियर 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज होणार होता.

काही काळापूर्वी साऊथ स्टार ‘नेत्रिकान’ चित्रपट( netrikan) ऑनलाईनवर लीक झाला आहे. त्याचबरोबर बॉलीवूडचा बिग बजेट मल्टीस्टारर ( bhuj)  चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ ही ऑनलाईन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा मोठा फटका चित्रपटसृष्टीला सहन करावा लागणार आहे, तर इतर निर्मितदेखील विचारात पडले आहेत.

खरं तर ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2020 रोजी सिनेमागृहांतच प्रदर्शित होणार होता. परंतु गेल्यावर्षीच्या कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.( Lockdown pandemic)

13 ऑगस्ट आधी हा चित्रपट इतरही भाषांमध्ये साइटवर ऑनलाईन लीक झाला असून आता स्ट्रीमिंगमुळे ( striming )दिग्गज कलाकारांच्या प्रवाहासह या चित्रपटावर बराच परिणाम होऊ शकतो, कारण या घटनेमुळे ओरिजनल दर्शकांना अडथळा निर्माण होईल.

अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर आणि एमी विर्क अभिनित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ पाइरेसीचा बळी पडल्याचे सांगितले जात आहे.(Ajay Devgan, Sanjay Dutt, Sonakshi Sinha ,Nora fatehi)

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले आहे. ‘भुज’ विजय कर्णिक (अजय देवगण) यांच्या जीवनावर आधारित आहे, जे 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भुज विमानतळाचे प्रभारी होते. दुसरीकडे संजय दत्त रणछोरदास स्वाभाई रावरीची भूमिका साकारतो, ज्याने युद्धाच्या वेळी सैन्याला मदत केली. नोरा फतेह, हिना रहमान नावाच्या भारतीय गुप्तहेरची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठा माधरपर्या नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच प्रणिता सुभाष आणि इहाना ढिल्लो या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments