फेमस

Bollywood News : अभिनेताला पाहण्यासाठी बिग बी आणि ऐश्वर्याने घेतली धाव

अभिषेक बच्चन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग दरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे रुग्णालयाबाहेर उभे असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.अभिषेक बच्चनला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना ( Abhishek Bachchan) रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिषेक बच्चन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग दरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे . पण अभिषेक यांना नेमकी दुखापत कशी झाली? नेमंक कोणत्या कारणामुळे अभिषेक बच्चन हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

अभिषेकला भेटण्यासाठी बिग बी आणि बहिण श्वेता यांनी थेट रुग्णालय गाठले. तसेच त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी रुग्णालायात दाखल झाली आहे.( Big bee and Shweta comes hospital)

तसेच काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ या चित्रपाटाच्या शूटींग करीता ऐश्वर्या व्यस्त असल्याने अभिषेक बच्चनला दुखापत झाली,असल्याचे कळता ऐश्वर्या पतीला पाहण्यासाठी प्रायवेट जेटने थेट मुंबई गाठली आहे.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी ( viralbhayani ) यांनी सोशल मीडिया अकांऊटवर अमिताभ बच्चन यांचे फोटो शेअर केले. या फोटोमुळे चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.व्हायरल फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता नंदा देखील पहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments