फेमस

Bollywood News : विकी कौशल, कतरिनाचा झाला साखरपुडा? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल झालेलं आहेत

Bollywood News  : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल ( Vicky Kaushal) यांच्या साखरपुड्याची, रोका विधीची बुधवारी चांगलीच चर्चा रंगली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल झालेलं आहेत.

अनेक कार्यक्रमात विक्की कौशल आणि कैतरिना कैफ यांना एकत्र पाहण्यात आलं. या दोघांनी मात्र आपल्या नात्याबाबत कधीच खुलासा केला नव्हता. सोशल मीडियावर ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली.

दोघांनी आपल्या नात्याला नाव दिलं असं समजून चाहते देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला पुन्हा डंप केल्याबद्दल अनेकांनी खेद व्यक्त केला आहे, तर अनेकजण सलमान खानची खिल्ली उडवत आहेत. या सोशल मीडिया प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.(salman khan )

मात्र आता या बातमीचं सत्य आता समोर आलं आहे. अभिनेत्री कतरिना कैफच्या टिमने या बातमीमागचं सत्य सांगितलं आहे.अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचा साखरपुडा किंवा रोका झालेलं नाही. त्यांनी कोणताच खासगी सोहळा ही केलेला नाही. त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच ऑफिशिअल अनाऊन्समेंट झालेली नाही.फोटोग्राफर विरल भयानीने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. मात्र ती पोस्ट आता काढून टाकली आहे.ही एक अफवा होती.(viral Instagram post )

अभिनेत्रीच्या टीमने एक माहिती दिली आहे.कतरिना लवकरच टाइगर 3 च्या शुटिंगकरता निघणार आहे.’या चित्रपटात इम्रान हाश्मी पहिल्यांदाच दोन्ही स्टार्ससोबत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान देखील एक कॅमिओ करणार आहे.(shahrukh khan )

तर माहितीनुसार, कतरिना सलमान खानसोबत इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे विमान रद्द झाले. त्यामुळे हे दोघं पुन्हा एकत्र प्रवास करणार आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments